उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पशुसंवर्धन विभागातर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात फिरते पशुचिकित्सा पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.सध्या हे फिरत पथक कळंब आणि भूम तालुक्यात कार्यान्विीत झाले आहे.पशुपालकांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

 राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंधत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी, इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमीतपणे पुरविल्या जातात. तथापि, पशुधन आजारी पडल्यास या पशुधनास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते.बहुतांश पशुपालकांना हा आर्थिकभार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवे अभावी पशुधनाचा मृत्यू होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची क्षमता वाढविण्यसासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. त्याकरिता उत्कृष्ठ दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेच आहे.

   यासाठी राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बाहुल भागामध्ये तसेच ज्याभागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आहे. तसेच दळणवळणाच्या सेवा अपु-या आहेत. अशा तालुक्यामध्ये पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी फिरते पशुचिकीत्या पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकीत्सा पथक तालुका कळंब आणि तालुका भूम या दोन तालुक्यासाठी कार्यान्वित झाले आहे.मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरत्या पशुवैद्यकाचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुक्यासाठी राहिल.ज्या प्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. त्याच प्रमाणे फिरत्या पशुवैद्यकीय  दवाखान्यामार्फत पुरविल्या जातात.पशुवैद्यकीय सेवा प्रभावीपणे पोहचविण्यासाठी संबंधित तालुक्याच्या पशुपालकांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन आपली अडचण नोंदवावी.जेणेकरुन हा कॉल संबंधित रुग्णवाहिकेशी जोडून पशुपालकांना त्यामुळे लवकरात लवकर औषधोपचार मिळण्यास मदत होईल.

 सेवा शुल्क मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुवैद्यकीय पथकामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवासाठी शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दराने सेवाशुल्क आकारण्यात येईल.या सेवाशुल्का व्यतिरिक्त कोणतेही सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही.  सर्व भूम व कळंब तालुक्यातील पशुपालकांना शासनाच्या या मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुवैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

 
Top