कळंब / प्रतिनिधी - 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या मुख्यालयाचे उदघाटन मुंबई येथे चिंचपोकळी परिसरात, रविवार १आगस्ट२०२१ रोजी प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे (कळंब) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील आयएमएच्या विविध शाखेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्टात आय एम ए च्या २२० शाखा असून ४६०००+ सदस्य संख्या आहे. नवीन वास्तु मुंबई च्या मध्यवर्ती ठिकाणी असुन मुंबई सेंट्रल, महलक्ष्मी, भायखळा, चिंचपोकळी रेल्वे स्टेशन पासून खुप जवळ आहे. यामुळे मुंबई सिटी व महाराष्ट्रा तुन येणाऱ्या डॉक्टर्स मंडळींची गैरसोय दुर झाली आहे. जागेच्या उपलब्धतेसाठी आय एम ए ब-याच दिवसापासून प्रयत्नशील होती.

उद्घाटन समारंभासाठी डॉ अशोक आढाव, डॉ यशवंत देशपांडे, डॉ मिलिंद नाईक, डॉ कुश झुनझुनवाला, डॉ संजय देशपांडे ( नागपूर), डॉ रवि वानखेडकर, डॉ निता बियाणी ( धुळे ), मंगेश गुलवाडे (चंद्रपूर), राष्ट्रीय महासचिव डॉ जयेश लेले, डॉ बकुळेश मेहता, डॉ सुहास पिंगळे (मुंबई वेस्ट), एम् एम् सी चेअरमन डॉ शिवकुमार उत्तुरे, सचिव डॉ पंकज बंदरकर, हुजी कपाडिया, डॉ कैझर बारोट,जितेश मेहता, डॉ गिरीश लाड, डॉ सुजातुनिशा आत्तार , डॉ अनिल पाचनेकर (मुंबई शाखा), डॉ टी सी राठोड (यवतमाळ ),  डॉ वसंतराव लूंगे ( अमरावती), डॉ जयंत नवरंगे, डॉ बाळासाहेब देशमुख, डॉ अविनाश भोंडवे, डॉ प्रकाश मराठे ( पुणे), डॉ शिवाजी काकडे (माजलगाव). डॉ संतोष कुलकर्णी (कुर्डुवाडी), डॉ संतोष खडतरे ( अकलूज), डॉ समीर चंद्रात्रे, डॉ राजेंद्र कुलकर्णी, डॉ हेमंत सोनानीस, डॉ महेश पाटील ( नाशिक), डॉ स्नेहल फेगडे, डॉ अनिल पाटील, ( जळगाव), डॉ राखी आगरवाल, डॉ राजीव आगरवाल ( मिरा भाईंदर) , डॉ मंगेश पाटे, ( डोंबिवली),डॉ उज्वला बर्दापुरकर ( भिवंडी),  डॉ संतोष कदम ( ठाणे), डॉ शेखर गालिंदे, डॉ प्रकाश खलप  (चेंबुर), डॉ निसार शेख (अहमदनगर) डॉ रविंद्र कुटे (श्रीरामपुर), डॉ अरुण पावडे (वर्धा), ई नी सहभाग घेतला.

 
Top