तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद आँल डीलर्स असोसिएशन अंतर्गत “श्री तुळजाभवानी तुळजापूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्या” पदाधिकारी निवडी झाल्या.

यामध्ये तुळजापूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंद कंदले, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष उमेश ताकभाते,सचिव  अँड.शैलेश पाठक , सहसचिव ऋषिकेश हंगरगेकर ,कोषाध्यक्ष विष्णू म्हात्रे यांच्या निवडी झाल्या.  या बैठकीत श्री राव साहेब ,श्री बाबा क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले सदरील बैठकीत पेट्रोल पंप चालक व मालक यांच्या अनेक समस्या बाबत सविस्तर चर्चा झाली, या असोशिएशन भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल ,ईसार पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम चे सर्व कंपनीचे एकूण 23 पेट्रोल पंप सामाविष्ट आहेत .यावेळी नगरसेवक विजय कंदले ,नय्यर जहागीरदार, गोपाळ देशमुख ,लक्ष्मण उळेकर ,दत्ता बरबडे,किर्ती जमदाडे ,अमित तांबे, बाबा गाडे ,विनोद कोकणे ,रमेश कदम गौरव जेवळीकर ,रविकांत पाटील, शिवाजी सोमाजी,अमोल सांजेकर, प्रेम गवळी, पिंटू लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top