तुळजापूर  / प्रतिनिधी-

 मराठा आरक्षणासाठी असा दबाब गट तयार करा की,  मुखमंञीच काय पंतप्रधान ही झुकले पाहिजे तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल असा सूर  तिर्थक्षेञ तुळजापूर येथे रविवार दि.८ रोजी आयोजित मराठा क्रांती मोर्चा आयोजित चिंतन बैठकीत निघाला .

 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवार दि. ८रोजी आयोजित चिंतन बैठकीत बोलताना मराठा बांधव म्हणाले की, राज्यात साडेचार कोटी मराठा समाज बांधव आहे .ऐकीकाळी जमिनदार असणारा  मराठा आज अतिअल्पभूधारक बनला आहे.आपण इतर समाजांचा मोठा भाऊ म्हणून इतर समाजांना आरक्षण दिले आज मोठा भाऊ छोटा बनला आहे. त्यामुळे इतर समाजाने मोठ्या मनाने मराठा समाजातील अर्थिक दुर्बल समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी सहकार्य  करावे,असे आवाहन केले.

मराठ्यांनी मराठ्यांन बाबतीत कुठेही कुचेष्टा करु नका, संविधानातुन आरक्षण मार्ग कसा कढायाचा याचा विचार होणे गरजेचे आहे.कायदे मंडळातुन आरक्षण मिळणे गरजेचे आहे.मराठा आरक्षणाचा चेंडु झाला आहे हे थांबवणे गरजेचे आहे मराठा समाजाने देशाचा विचार केला पण आज मराठा समाजाचा विचार इतर समाज करित नाही हे आपले दुर्दव आहे,  या चिंतन बैठकीसाठी आ.राणाजगजितसिंह पाटील, जयराजे निंबाळकर, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अँड धिरज पाटील , राजेसिंह निंबाळकर, रेखा लोमटे, अँड मनिषा पाटील,  किरणताई निंबाळकर, माया चव्हाण, नगरसेवक सचिन पाटील,  सुनिल रोचकरी, बापु कणे, सतिश खोपडे उपस्थितीत होते

  या चिंतन बैठक  यशस्वीतेसाठी . राज्य समन्वयक -  सज्जनराव साळके,   जिवनराजे इंगळे,  आबासाहेब कापसे,  प्रशांत अपराध - श्री अजय  साळुके, महेश गवळी,  प्रतिक रोचकरी , अण्णा क्षिरसागर, कुमार टोले, अर्जून सांळुके  आदींनी परिश्रम घेतले.

 
Top