उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार कळंब येथील प्राचार्य डॉ.अशोक ज्ञानदेवराव मोहेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

    विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराच्या वर्धापन दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कार कळंब येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर यांना प्रदान करण्यात आला. उपपरिनसराच्या १७ व्या वर्धापन दिन मंगळवारी सकाळी पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला. ‘एन साई‘चे संस्थापक, कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, संचालक डॉ.दत्तात्रय गायकवाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

 
Top