उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोविड-१९ आजारापासून सरंक्षण होणे करीता मास्क, सॅनिटायझरचा वापर, हात वारंवार स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या बाबीं सोबतच कोविड-१९ प्रतिबंधक लस हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ही लस घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतेच पण यदाकदाचित संसर्ग झालाच तरी कोविड-१९ आजाराची तिव्रता अत्यंत कमी राहते. त्यामुळे न्युमोनिया किंवा मृत्यू टाळता येतो, त्यासाठी  गरोदर मातांनी प्रधानमंत्री सुरक्षित अभियानामध्ये ९ ऑगस्ट रोजी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

 उस्मानाबाद जिल्हयामध्ये गरोदर मातांना कोविड-१९ प्रतिबंधक लस समुपदेशन करुन देणे करीता दि.०९/०८/२०२१ रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मधून गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या इतर आरोग्य सेवांसोबतच कोविड-१९ प्रतिबंधक लसीबाबत समुपदेशन आणि इच्छुक मातांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोविड-१९ महामारीमध्ये सर्व नागरीकांसोबतच गरोदर मातांनी देखील स्वतःचे व होणाऱ्या बाळाचे या आजारापासून संरक्षण होण्याकरीता अधिकाधिक गरोदर मातांनी कोविड-१९ ची लस घ्यावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


 
Top