तुळजापूर / प्रतिनिधी-

नगर परिषद शाळेतील सर्व शिक्षकांना १०० टक्के अनुदान मिळावे  यासाठी आजपासून आपण पाठपुरावा करून १०० टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच नगर परिषद व महानगर पालिका शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण  सदैव  प्रयत्नशील राहू ,असे उद्गार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले. 

 महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ जिल्हा उस्मानाबाद आयोजित लातूर विभागीय शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अामदार राणा पाटील बोलत होते.राज्याध्यक्ष नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ अर्जुनराव कोळी हे‌ अध्यक्षस्थानी होते.  प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उस्मानाबादचे उपाध्यक्ष अभय इंगळे, शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी, उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार, राज्यचिटणीस अरुण पवार, राज्य महिला आघाडी प्रमुख  रवींद्र मिरगणे, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कडलग, राज्य सदस्य माया कांबळे, नंदा तांदळे, सविता बोरसे,रेजा पायाळ, विभागीय अध्यक्ष अशोक शेंडगे ,जिल्हाध्यक्ष शाम कोळी उपस्थित होते.प्रस्ताविकात   विभागीय अध्यक्ष  अशोक शेंडगे यांनी केले. यावेळी सिद्धेश्वर कोळी, जयंत इंदापूरकर, भेगोले यांची भाषणे झाली.  अध्यक्षीय समारोप मध्ये अर्जून  कोळी  यांनी केला. संचलन रेजा पायाळ यांनी केले. 

 मेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेश गायकवाड, दिगंबर काळे, मनोज भोईटे, संतोष खंगले,अरविंद जाधव, महेंद्र पाटील, महेंद्र कावरे , मुकुंद नांगरे, आयाज मशायक, शंकर पंढे, संभाजी पडवळ, विश्वंभर माने, मधुकर खिल्लारे, बालाजी कानडे, दशरथ नधाडे, अण्णासाहेब जावळे, सुरेश मदने,  नईम सय्यद, अतुल कनोजवार,  प्रसाद पाटील, अमोल मोरे, श्नीकांत वाघमारे, गणेश रोचकरी, सुरजमल शेटे, लातूर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.


 
Top