तुळजापूर / प्रतिनिधी-

पारंपरिक लोककलावंत आणि ओबीसी भटके विमुक्त यांच्या न्याय्य हक्कांसाठी जनजागरण अभियान अंतर्गत काढण्यात आलेल्या दंडवत यात्रेचा समारोप तुळजाभवानी मातेच्या महाद्वारा समोर समारोप करण्यात आला.

 राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहीर, भजनी परिषदेचा वतीने लातूर जिल्ह्यातील नणंद येथून दंडवत यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा समारोप श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आला. या वेेळी यात्रेत सहभागी असलेल्या सर्वांचे शाल, श्रीफळ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

 
Top