उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

गेल्या 35 वर्षांपासून साहित्य सेवेमध्ये योगदान दिले असून, मराठी, हिंदी, इंग्रजी, तिन्ही भाषेतून गझल, कविता, अभंग अशा विविध प्रकारांमध्ये आतापर्यंत 861 रचना लिहिल्या आहेत.तसेच “घुसमट” हा मराठी कविता संग्रह,”कशिश” हा हिंदी गझल संग्रह, उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची इत्यंभूत माहिती देणारे “उस्मानाबाद पर्यटन” हे पुस्तक, आणि “कोरोना डेज” ही कादंबरी अशा चार साहित्यकृती प्रकाशित असून, “पाझर” हा मराठी गझलसंग्रह चे पाचवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

    उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य आयोजक मंडळा मध्ये आयोजक म्हणून महत्वपूर्ण कार्य पार पडले असून ‘कवी कट्टा’ उपक्रमाचे समन्वयक म्हणून देखील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. दुसऱ्या अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलन अध्यक्ष म्हणून काम केले असून इतरही अनेक ठिकाणी कवी संमेलन अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. चार वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला असून इतर अनेक राज्यस्तरीय, मराठवाडास्तरीय, अखिल भारतीय संमेलनांमध्ये,मुशाय-यामधे  देखील सहभाग घेतला आहे. अनेक दैनिकातून, दिवाळी अंक, मासिकातून विविध विषयावर विपुल प्रमाणात लेखन केले असून, आकाशवाणीवर देखील साहित्य संदर्भात कार्यक्रम झालेले आहेत.   यापूर्वीही राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्राप्त असून, “राज्यस्तरीय शांतीदुत सेवारत्न पुरस्कार” देखील मिळाला आहे.आतापर्यंतच्या या साहित्य सेवेची दखल घेऊन नगरपालिका उस्मानाबाद तर्फे श्री युवराज नळे यांना पालकमंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या हस्ते साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल “साहित्य कार्यगौरव पुरस्कार-२०२०” हा पुरस्कार सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.याप्रसंगी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.

 
Top