उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीसीद्वारे मोटार वाहन कर जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूली योग्य असलेल्या रक्कमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत. या थकबाकीची दिनांक 27 जुलै 2021  पूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली नाही तर उक्त वाहने ई-लिलाव पध्दतीने विकण्यात येतील. लिलावाच्या दिनांकांनंतर थकबाकीदारास वाहनाचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकार राहणार नाही. अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधिन राहील.

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एस.टी. वर्कशॉप येथे अटकावून असलेल्या व वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनाची लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने http://www.eauction.gov.in या संकेत स्थळावर करण्यात येईल. लिलावाबाबत अटी व शर्ती  आणि वाहनांची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

  ई-लिलाव ऑनलाईन/ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिनांक 27 जुलै 2021 सकाळी 10 ते दिनांक 28 जुलै 2021 दुपारी 4 पर्यंत आहे. कागदपत्रे पडताळणी व मंजुरी दिनांक 28 जुलै 2021 दुपारी 5 ते दिनांक 30 जुलै 2021 सकाळी 10 पर्यंत आहे. ई-लिलाव ऑनलाईन दिनांक 30 जुलै 2021 सकाळी  11 ते दुपारी 4 पर्यंत आहे.

 
Top