उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोविड-19 ची आपत्ती अद्याप संपलेली नाही.किंबहुना सध्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची कोविड बाबत नुकतीच आढावा बैठक बोलवण्यात आली होती.त्यावेळी त्यांना सूचना देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी येणाऱ्या काळात कोविडची लाट थोपविणे आवश्यक आहे.त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे,अशा सूचना दिल्या.

 नागरी व ग्रामीण भागात तपासण्या वाढविणे,लसीकरणावर भर देणे,कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे,समाजातील दुर्बल व अति जोखीमीचे घटक जसे ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारी नागरिक,गरोदर माता,अनाथ बालके व स्थलांतरीत समूह यांच्यावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.यावेळी तालुकानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला.

 या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे एस.एन.,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद जे.एन. व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


 
Top