उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 24 जुलै 2021 रोजी 14 लसीकरण केंद्रावर 18 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. 

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर लाभार्थ्यांना केवळ कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आणि ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 यामध्ये जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद ,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड,उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राम नगर उस्मानाबाद,   ग्रामीण रुग्णालय मुरूम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा, कळंब, परांडा आदी १४ केंद्रावर लसीकरण होणार आहे. 

  लसीकरणाची वेळ सकाळी 9 वाजल्या पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना केवळ पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आणि केवळ दुसरा डोस घेण्यासाठी ऑन साइट (ऑन स्पॉट) नोंदणी या सुविधा उपलब्ध आहेत.

    लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


 
Top