मुरूम / प्रतिनिधी

येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखाधिकारी पुरुषोत्तम किशन यांची नांदेड येथे बदली झाली. या शाखेत नूतन शाखाधिकारी अरविंद नायक रुजू झाल्याबद्दल त्यांचा विविध संस्था, संघटनांमार्फत त्यांचा मंगळवारी   यथोचित सत्कार करण्यात आला. 

या शाखेला या परिसरामध्ये नावारूपाला आणून उर्जित अवस्थेमध्ये आणण्यात किशन यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ग्राहकांना विविध सेवा- सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्यांनी पुरविल्या. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, व्यापारी संघटनेचे अशोक मिणीयार, डॉ. नितीन डागा, नगरसेवक रशिद शेख गुत्तेदार, गौस शेख, प्रा. मुकूंद धुळेकर, प्रा. डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. नागनाथ बनसोडे, अँड. एस. पी. इनामदार, भुसणीचे सुभाष गायकवाड, सहाय्यक शाखाधिकारी बालाजी मरे, ऑफीसर गणेश आरनापल्ली, रोखपाल प्रणित बागडे, प्रविण जोडे, भीमाशंकर कलशेट्टी, प्रविण भालेराव आदींसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top