परंडा / प्रतिनिधी :-  

शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र  विभाग प्रमुख डॉ.महेशकुमार माने यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या तदर्थ अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली.  

त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आणि श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,डॉ.राहुल देशमुख डॉ.विशाल जाधव ,डॉ. विद्याधर नलवडे, डॉ.अतुल हुंबे, डॉ.सचिन चव्हाण, प्रा.संतोष काळे ,प्रा.अमर गोरे पाटील आणि प्रा. जगन्नाथ माळी उपस्थित होते. 

यावेळी सत्कारास उत्तर देताना डॉ.महेशकुमार माने यांनी सांगितले की माझ्या वर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे  पार पाडेन.संस्थेने आणि महाविद्यालयाने दिलेल्या संधी मुळे मला या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून जाता आले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या  डॉ.दीपा सावळे म्हणाले की डॉ महेशकुमार माने यांनी खूप प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक  प्राध्यापकांनी याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करावे आणि विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या अभ्यास मंडळावर जाऊन महाविद्यालयाचे नाव नावलौकिक करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.विद्याधर नलवडे यांनी मानले.


 
Top