उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील अंध व वयोवृद्ध भिसे दांपत्याची होत असलेली उपासमार पाहून परंडा तालुक्यातील सोनारी येथील सचिन सोनारीकर यांनी भिसे दांपत्यांची भेट घेऊन त्यांचे पालकत्व स्विकारले असून त्यांच्या कायमस्वरुपी जेवनाच्या डब्याची सोय व त्यांच्या मुलभूत गरजा ते भागवणार आहेत.

  गेल्या सहा सात महिन्यांपूर्वी भिसे दांपत्यांना जिल्हाभरातून मदतीचा हात मिळाला होता.काही महिने त्यावर त्यांची उपजीविका भागली परंतू सध्या जैसे थे परस्थिती निर्माण झाल्याने सोनारीकर भिसे दांपत्यांच्या मदतीसाठी धावले आहेत.सोनारीकर हे त्यांच्या गावी दिड हजार माकडांचा सांभाळ करण्याच काम करतात.सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून त्यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 
Top