उमरगा /प्रतिनिधी

 उमरगा नगरपालिकेत चालू पंचवार्षिकमध्ये काॅग्रेसची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी थेट मंत्रालयातुन वैशिष्ट्य योजनेंतर्गत ठोक अनुदान योजनेतून थेट मंत्रालयातुन ९ कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेतून ६ कोटी, शहरातील विविध भागात सिमेंट रस्ते व गटारीची कामे करण्यात आली आहेत. तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी २ कोटी रुपये, अंतुबळी पतंगे सभागृह नुतनीकरणासाठी १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी सांगितले.

 उमरगा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले तीन राज्यांच्या सिमेवर वसलेले शहर. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. २०१३ साली शहराची हद्दवाढ करण्यात आली आहे. पालिकेत काॅग्रेस-भाजपाची सत्ता आहे. पालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सत्ताधारी व विरोधकात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. विकासकामांचा श्रेयवाद सुरू झाला आहे. याबाबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र काॅग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून उमरगा शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये विशेष वैशिष्ट्य योजनेंतर्गत ठोक अनुदान योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये थेट मंत्रालयातुन ९ कोटी रुपयेचा निधी रस्त्याचे कामासाठी उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालय परिसरात सिमेंट काॅक्रीटचे रस्ते बांधण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त विशेष रस्ता अनुदान योजनेतून सन २०१६-१७ मध्ये १ कोटी, सन २०१८-१९ मध्ये २ कोटी, तर सन २०१९-२० मध्ये सिमेंट काॅक्रीटचे रस्ते व गटारी करण्यात आलेल्या आहेत. तर २०२०-२१ साठी १ कोटी रुपयाची सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. याव्यतिरिक्त वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सन २०१७-१८ मध्ये नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर झालेल्या २ कोटी रुपये निधीतून टोलेजंग प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. तर सन २०१८-१९ मध्ये १ कोटी रुपयाचे निधीतून अंतुबळी पतंगे सभागृह नुतनीकरणासाठी करण्यात आले आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी दिली.

 
Top