उमरगा / प्रतिनिधी-
उमरगा जिल्हा परिषदेने मियावकी जंगल निर्मिती करून पाच हजार वृक्ष लागवड केली आहे. ही संकल्पना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने राबविण्याची गरजेचे असल्याचे मत लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले आहे.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी गुरुवारी (दि.१५) भेट दिली. जिल्ह्यातील पहिले आयएसओ मानांकित हायस्कूल, पहिले तंबाखूमुक्त हायस्कूल, मियावकी जंगली निर्मिती, दोन लाख ११ हजार रुपये लोकवाटा जमा अटल टिंकरिंग लॕब मिनी सायन्स लॅब ऑनलाइन शिक्षण ब्रिज कोर्स याबद्दल समाधान व्यक्त केले. मियावकी जंगल निर्मिती करून पाच हजार वृक्ष लागवड करुन घेतलेल्या कष्टा बद्दल शाळेचे कौतुक केले. तर शाळेतील विविध उपक्रम ऑनलाईन शिक्षण व ब्रिज कोर्स अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. मियावकी जंगल निर्मिती ही संकल्पना जिल्ह्यात सर्व शाळांनी राबवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता उपासे आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मानले. यावेळी अटल इन्चार्ज बशीर शेख धनराज तेलंग सदानंद कुमार. ममता गायकवाड. सोनाली मुसळे. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव पवार उपस्थित होते.