लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील अडवलेला शेत रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला शेतकऱ्यांना जाण्यासाठी गट नं.395 मधील धर्मराज बापुराव पाटील, काशीनाथ बापुराव पाटील, इंदाबाई अशोक पाटील, पुष्पाबाई अशोक पाटील हे जाणीवपूर्वक अडवणुक करीत आहेत. शेतकऱ्यांना अनेक कामासाठी अडचण होत असून पेरणी, औषध फवारणी, कोळपणी, राशी ने - आण करण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तरी हा शेत रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, अशी मागणी तिन महिन्यांपूर्वी तहसीलदार यांच्याकडे  केली आहे. अद्यापपर्यंत हा रस्ता मोकळा करुन दिला नाही. तरी हा शेत रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्या कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

या निवेदनावर अण्णाप्पा कदारे, प्रमोद माने, दत्ता मुळे, सुधाकर मुळे, गोरोबा माने, अनिल पाटील, अनिल सोमवंशी आदी  शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top