उमरगा / प्रतिनिधी-

कोरोना काळात उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसेनेचे कार्य घराघरापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिक नोंदणी करावी व हे शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन मा. खा. प्रा. रविंद गायकवाड यांनी केले.

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात १२ जुलै ते २१ जुलै दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी (दि.१३) उमरगा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांची बैठक सम्पन्न झाली. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जि.प.सदस्य शेखर घंटे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, युवा सेना उमरगा तालुकाप्रमुख अजित चौधरी, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अभिमान खराडे, शाम नारायणकर, सलीम शेख, श्रीकांत भरारे, अमीन सुंभेकर, महेबूब गवंडी, अविनाश माळी, भरत सुतार, सरपंच नामदेव लोभे, परवेज तांबोळी, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शेखर पाटील, प्रशांत पोचापुरे, संदीप जगताप, भगत माळी, संदीप चव्हाण, विक्रम दासमे, परमेश्वर साळुंके आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top