उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

“श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानातंर्गत परंडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक दि. २३ जुलै रोजी आ. सुजितसिंह ठाकूर  यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत एकूण ५ जिल्हा परिषद गटानुसार बूथ कमिटीचा आढावा घेतला २८ शक्तिकेंद्रा पैकी २५ शक्ती केंद्र प्रमूख उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले.सक्षम बूथ बनविणे, महिला सदस्यांचा समावेश करणे, सर्व समावेशक बूथ रचना करणे इत्यादींबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.

     बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.सुधीर पाटील, ॲड. श्री. खंडेराव चौरे, श्री.नेताजी पाटील,‌ धाराशिव लोकसभा बुथ समन्वयक श्री. शिवाजी गिड्डे-पाटील, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top