तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर विकास प्राधिकरणातंर्गत   छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  ते शुक्रवार पेठ पाण्याच्या टाकी पर्यंत तसेच  मंगळवार पेठ व संपूर्ण शहरात विद्युत खांब  बसविण्याचे काम सुरु आहे. याची  तपासणी  करुन मगच बिल अदा करावे , अशी मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ उपाध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष विपीन शिंदे यांनी  जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे,

  निवेदनात म्हटलं आहे की, रस्ता खोदकाम केला पण रस्ता दुरुस्ती केला नाही,  तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत शहरात रस्ते कामे करताना  पाणी पुरवठा गटार ड्रेनेज पथ दिवे व लाईट यांचे रोड करत असताना नियोजन केले असणारच त्याची कामे झाली किवा नाही याची शहानिशा व्हावी, कामे झाली असतील तर सदरील रोड फोडल्यामुळे प्राधिकरणाच्या लाखो रुपायचे नुकसान झाले आहे, त्याची जबाबदारी निश्चित करावी तसेच विद्युत प्रवाह भूमिगत करताना  नियमा प्रमाणे झाले का  याची चौकशी व्हावी, शहरातील रोड फोडताना नगर परिषदेने परवानगी दिली काय ? त्याची रक्कम भरून घेतली आहे काय ? सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी,अशी मागणी केली आहे.

 
Top