उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खामसवाडी गावातील कु.अमिशा  निरफळ( एमबीबीएस , गव्हर्नमेंट कॉलेज, गोंदिया), कु. मोहिनी देशमाने( बी ए एम एस मुंबई), कु अमृता देशमाने( बी ए एम एस पुणे) या ठिकाणी प्रवेश मिळवल्याबद्दल धनेश्र्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रताप सिंहजी पाटील यांच्या शुभहस्ते  शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रा. सुशील शेळके यांच्या  स्वगृही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य श्री. वसंतराव शेळके सर, राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील शेळके,  पांढरी ता. बार्शी चे पोलीस पाटील श्री   घावटे सर, खामसवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शरद शेळके , श्री कुलदीप  घावटे,  श्री राजाभाऊ शिंदे,तेली संघटनेचे  कळंब तालुका अध्यक्ष श्री सचिन देशमाने,श्री आतम देशमाने, बाबा देशमाने ,सुरज पाटील ,अजित शेळके आदींची उपस्थिती होती. भविष्यात कोणतीही अडचण आल्यास मला निसंकोचपणे सांगा मी  नक्कीच सहकार्य करीन,असे आश्वासन डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी  दिले.

 
Top