उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात कोेरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णाने वैद्यकीय पथकाला माहिती न देता रुग्णालयातून पलायन केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडली असून, याप्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून संबंधित रुग्णावर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचार घेत असलेले कोविडचे आंतररुग्ण ज्ञानदेव शिवाप्पा गायकवाड (६० वर्षे, रा. वाणेगांव, ता. तुळजापूर) हे बुधवारी दुपारी दीड वाजता वैद्यकीय पथकास काहीही न सांगता रुग्णालयातून परस्पर निघून गेले. त्यांनी कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होईल, अशी निष्काळजीपणा केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी सतिश आंबुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top