उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उत्पादक गटामार्फत रोजगार निर्मिती करण्यात आली आली आहे. या उत्पादक गटांनी इतर बेरोजगारांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात विविध उत्पादक गट कार्यरत असून अनेकांना  यातून रोजगार मिळत आहे. स्थानिक स्तरावर कमी गुंतवणुकीमध्ये सहजपणे चांगल्या रोजगाराच्या संधी विविध  उत्पादक गटांनी निर्माण केल्या आहेत. ही बाब अत्यंत चांगली असून या गटांनी सामाजिक बांधिलकी म्हणून इतर गटांना, बेरोजगारांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावरील स्त्रोतांचा पुरेपूर वापर केल्यास शेतीवरील ताण कमी होईल तसेच शेती पूरक व्यवसायास चालना मिळून बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल असे फड म्हणाले. फड यांनी यावेळी उत्पादक गटातील सर्व सदस्यांनी तसेच महिला बचत गटातील सदस्यांनी वृक्ष लागवड कामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा केली.  उत्पादक गटाच्या घरकुल मार्ट तसेच शिलाई मशीन उद्योगाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आदी कार्यालयांना भेटी देऊन स्वच्छता व वृक्ष लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. बलवीर मुंडे, समाधान जोगदंड, गोरक्षनाथ भांगे आदी उपस्थित होते.


 
Top