उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने तात्काळ द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने दि.४ जून रोजी   जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी आघाडी म्हणणारे सरकार असेल तरी पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी या महाआघाडीचा बुरखा फाटला असून हे दलित विरोधी सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन निदर्शने करण्यात येतील असे इशारा देण्यात आला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, युवक जिल्हा सरचिटणीस राजरत्न शिंगाडे, कामगार आघाडी प्रमुख गौतम कांबळे,  आकाश इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संपतराव जानराव, युवा उपाध्यक्ष मराठवाडा रणजीत मस्के व शहराध्यक्ष अरुण कदम यांच्या सह्या आहेत.


 
Top