उमरगा / प्रतिनिधी-  उमरगा येथे देवी अहिल्या महिला सेवा भावी संस्था व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीचे पूजन डॉ.स्नेहा सोनकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या महिला मेळाव्यात डॉ.स्नेहा सोनकाटे  यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.  आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन सर्वांना केले होते. या आवाहनाचा मान राखत धनगरी वेश परिधान करून   ही जयंती साजरी करण्यात आली. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक उत्तम आणि जनकल्याणकारक राज्यकर्त्या होत्या. आम्हा समस्त धनगर समाजासाठी श्रद्धास्थानी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या समाजातील सर्व स्त्रियांसाठी आदर्शस्वरुप आहेत. असे मार्गदर्शन डॉ.स्नेहा सोनकाटे  यांनी केले. दरम्यान  गरीब विधवा महिलांना   गहू, ज्वारी आदी धान्याचे  वाटप करण्यात आले. यावेळी बहुंजन समाजातील सर्व   महिला उपस्थित होत्या.  .या कार्यक्रमाचे नियोजन विजया सोनकाटे यांनी केले .यावेळी सर्व महिलांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व पिवळ्या ध्वजाचे पूजन केले. 

 
Top