उस्मानाबाद / प्रतिनीधी 

ओबीसी राजकीय आरंक्षण संदर्भात ओबीसी राजकीय आरंक्षण समिती उस्मानाबाद व बहुजन योध्दा सामाजिक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत मंगळवार दि. 22 जून 2021  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासोर घंटानाद आदोलना संदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णानुसार कारवाई करण्यात यावी , इतर मागास्वर्गीय व मागास्वर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागु करण्यात यावे 

,ओबीसीची जातनिहाय जणगनना करण्यात यावी , जो पर्यंत मागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यंत राज्यामध्ये कोणत्याही जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका घेण्यात येऊ नये,   विधान सभेमध्ये व लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण देण्यात यावे आदी   प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. 

निवेदन देते समयी ओबीसी आरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,उपाध्यक्ष अक्षय ढोबळे,सचिव रवि कोरे आळणीकर,कार्याध्यक्ष महादेव माळी,सहसचिव शिवानंद कथले,कोषाध्यक्ष इंद्रजित देवकते,संघटक सतिश कदम,सहसंघटक सतिश लोंढे,प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे,अजित माळी,शोसल मिडीया प्रमुख मुकेश नायगावकर,प्रमुख सल्लागार अँड खंडेराव चौरे,पिराजी मंजुळे,पांडुरंग लाटे,दाजी पवार,अजय यादव ज्ञानेश्वर पंडीत,नामदेव वाघमारे,बंटी बेगमपुरे,प्रमु़ख मार्गदर्शक धनंजय शिंगाडे,नितिन शेरखाने,आबासाहेब खोत,डी एन कोळी यांच्यासह ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती.


 
Top