परंडा / प्रतिनिधी :-

परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा तिसरा हप्ता १ जूलै २०२१ रोजी नियमित वेतना सोबत द्यावा याविषयीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांना व्हाट्सपच्या माध्यमातून देण्यात आले.

शासन निर्णया प्रमाणे १ जानेवारी ०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यांत प्रतिवर्ष १ हप्ता या पध्दतीत रोखीने अदा करण्या बाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.त्याची अंमलबजावणी म्हणून दरवर्षी ०१ जूलै रोजी एक हप्ता संबंधितांच्या नियमित वेतना सोबत अदा करण्यास निर्देशित आहेत.

शासन निर्णय क्र.२ प्रमाणे मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता सातव्या वेतन आयोगाची थकबाकीचा दुसरा हप्ता एक वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे.व दुसरा हप्ता प्रदान करण्या बाबतचे आदेश शासना कडून अजून अप्राप्त आहे.तथापि शासन निर्णय क्र.१ प्रमाणे ह्या वर्षी लागु असलेला तिसरा हप्ता ०१ जूलै रोजी अदा करणे बंधनकारक असल्याने क्रमप्राप्त आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

सदरील निवेदनावर प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, सचिव दत्तात्रय राठोड, जिल्हा समन्वयक फिरोज शेख, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, सल्लागार भास्कर कांबळे, गणेश गोरे, रविंद्र राऊत, जिल्हा संघटक योगेश चाळक, गोविंद तापडे, महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे, उज्वला सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

 
Top