उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल  शेतकऱ्यांच्या वतीने तसेच फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या वतीने पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. 

दोन महिन्यापासून जिल्ह्यात शेतमाल चोरीच्या अनेक घटना घडल्या. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून सोयाबीन लंपास केले. तसेच हरभऱ्याची कट्टे चोरट्यांनी पळवली होती. उस्मानाबाद तालुक्यासह कळंब वाशी तुळजापूर अशा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दोनच महिन्यात तब्बल दहा घटना घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होतं. पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन , गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सुमारे सहा लाख रुपयांचे विविध प्रकारचे धान्य जप्त केले असून आठ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. तसेच दोन व्यापारी यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी च्या वतीने पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. यावेळी  सूर्य तेज फार्मर्स प्रोडूसर कंपनीचे संचालक संकेत सूर्यवंशी, मार्गदर्शक प्रवीण तांबे, गणराज्य ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे संचालक कैलास शिनगारे उपस्थित होते.

 
Top