परंडा / प्रतिनिधी : -

 तालुक्यातील डोमगाव येथील ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण मोहन चव्हाण यांची  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या परंडा तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंढे यांच्या हस्ते देण्यात आले.

 यावेळी माजी आमदार राहुल भैय्या मोटे, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ आप्पा जगताप , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, मजूर फेडरेशन चे संचालक हरिश्चंद्र मिस्किन , बाबुराव काळे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top