तुळजापूर / प्रतिनिधी-

ग्रामस्थांनी वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे  मुख्यकार्यकारीअधिकारी डाँ. विजयकुमार फड यांनी आपसिंगा येथे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपन उपक्रम शुभारंभात केले .

यावेळी जिल्हापरिषद उप मुख्यकार्यकारी अधिकारी कुंभार, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, विस्तार अधिकारी राऊत, एकात्मिक बालविकास अधिकारी  हावळे, पशुसंवर्धन अधिकारी सादगिरे, तालुका आरोग्य अधिकारी डाँ सतिश पवार, सरवदे वैरागे, ग्रामसेवक दयानंद  रेड्डी, तांबोळी, मनोज चौघुले, बालाजी पारधे  सह सरपंच शंकर गोरे, उपसरपंच दिपक सोनवणे,अमीर शेख, अनिल खोचरे, सचिन जाधव,महेश पवार, राहुल साठे आदी मान्यवर उपस्थितीत होते.


 
Top