कळंब / प्रतिनिधी- 

येथील अमोल आण्णा शेळके यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र नुकतेच संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले यांनी दिले. या निवडीप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विक्रमादित्य मोरे हे उपस्थित होते.

या निवडीबद्दल बोलताना आण्णा शेळके यांनी सांगितले की, राज्यात मराठा समाज संघटीत करण्यासाठी व तरुणांचे बेरोजगारी कमी करण्यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मराठा तरुणांना दिशा देण्याचे काम संघटना करीत आहे. लवकरच मराठा जोडो अभियान घेऊन समाज एकजूट करण्याचे काम करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात मराठा समाजातील युवकांना पाठबळ देण्याचे काम संघटना करणार आहे. समाजातील वाढती बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न तरुणांचे मेळावे आयोजित करून सोडविण्याचे काम स्वाभिमानी मराठा महासंघ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

या निवडीचे स्वागत संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले, मार्गदर्शक शिवशाहीर ह.भ.प. कल्याण महाराज काळे, शिवशाहीर विजय तनपुरे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष गागरे, राज्य संपर्क प्रमुख सचिन भोसले, राज्य निरीक्षक अंकुश डांभे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष चेतन आहेर, अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना धुळे, जळगाव युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील, नाशिक युवक जिल्हाध्यक्ष भूषण गायकवाड, बीड जिल्हाध्यक्ष अमोल भोसले, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष अनिल धुमाळ, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळसे, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल म्हस्के, पारनेर तालुकाध्यक्ष निलेश दरेकर, करमाळा तालुकाध्यक्ष तानाजी मालुसरे, बाळासाहेब निपुंगे, रामकिसन मडके, अनिल सुपेकर, गणेश झगरे, संदीप वहाडणे आदींनी केले आहे.

 
Top