उस्मानाबाद /प्रतिनिधी - कोरोना संकटाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. या आदेशानुसार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र शनिवार व रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.५ जून रोजी जारी केले आहेत. 

दि.३ जून रोजीच्या कोरोना पॉझिटिव्हचा दर ५ ते १० टक्क्याच्या दरम्यान असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.  यात वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, शितगृह, वखार सेवा सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा नियमित सुरू राहणार आहे. खाजगी बसेस,खाजगी वाहनांना  सेवेसाठी परवानगी राहील.  सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री, दूध संकलन व वितरण, पशुखाद्य दुकाने स. ७ ते स. ४ पर्यंत सुरू राहतील . सर्व बँका, डाक सेवा पुर्ण वेळ ग्राहकांसाठी सुरू राहील. कृषी अवजारे, बियाणे, खताची दुकाने सकाळी ७ ते दु. ४ या वेळेत चालू राहतील. तर रेस्टॉरंट, बार, हॉटेल, खाद्य पदार्थांची दुकाने मिठाई, चिकन, मटण, मासे, अंडे विक्रेत्यांना देखील ५० टक्के असून क्षमतेच्या प्रमाणात ग्राहकांना खाद्य देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर व्यायाम करण्यासाठी जिम व खेळाच्या मैदानात पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी देण्यात आल्याचे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 
Top