जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा कडक इशारा


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दि.८ ते दि. १३ मे या कालावधीत ५ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. या पाच दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करु नये असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाने कोविड १९ या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  ब्रेक द चैन अंतर्गत पारित केलेल्या आदेशांनुसार संदर्भ क्र. ४ मध्ये या  कार्यालयाच्या आदेशान्वये जिल्ह्यात दि.१५ मे रोजी सकाळी ७ पर्यंत करावयाच्या कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आठवड्यातील शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू (विकेंड लॉकडाऊन) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे दि. ८ ते दि.१३ मेपर्यंत सलग ५ दिवस जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, नागरिक यांच्याकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहेत. 
त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी संदर्भ क्र. २ अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदींनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार जिल्ह्यातील करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दि. ८ मे सकाळी ७ वाजल्यापासून दि. १३ मे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात जनता कर्फ्यू राहील असे आदेशित दिले आहेत.
उक्त नमूद कालावधीत अत्यावश्यक बाबींचे अनुषंगाने यासोबतच्या परिशिष्ट १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संदर्भ क्र. ४ मधील नमूद आदेशांन्वये ज्या अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे त्या अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरु राहतील.
सदर आदेशाची अंमलबजावणी दि. ८ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान विनाकारण रस्त्यावर कोणी फिरून या नियमाचे उल्लंघन केले करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिवेगावकर यांनी दिला आहे.
 
Top