उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रुग्णांचा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगामुळे उपचारा दरम्यान सोलापूर येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे नवीन संकट उभे राहिले असून यामुळे अनेक रुग्णांना दुष्परिणामला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने याबाबत वेळीच उपाययोजना व औषधी साठा आणि यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अर्जुन उत्तरेश्वर लाकाळ ( रा. पळसप ता. उस्मानाबाद ) यांना कोरोनाची लागण झाली होती त्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते कोरोनातून बरे होत असतानाच त्यांच्या डोळ्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली व सोलापूर येथे त्याचे उपचार सुरू असताना ऑपरेशन करून एक निकामी झालेला डोळा काढावा लागला त्यातच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला , उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा हा पहिला म्युकरमायकोसिसचा बळी असून आणखी एक रुग्णही दगवल्याची माहिती हाती येत आहे.

 
Top