तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास  सहकार्य करा जे  कोरोना बाबतीत शासनाने दिलेल्या निर्दशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असा इशारा तहसिलदार सौदागर तांदळे यांनी आपसिंगा येथे भेट दिल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना दिला. 

आपसिंगा  येथे मागील एक महिन्यापासुन आपसिंगा येथे  कोरोना बाधीत रुग्ण आढळत आसुन शनिवारी २७ ग्रामस्थांची तपासणी केली असता ३ पाँजीटीव्ह आढळले असुन एक  तुळजापूर येथे तपासणीत कोरोना पाँजीटीव्ह आढळला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसिलदार सौदागर तांदळे व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड  यांनी आपसिंगा गावास भेट देवुन दुकानदार व ग्रामस्थांना कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करावेत या बाबतीत सुचना देवुन  सविस्तर मार्गदर्शन केले .

यावेळी सरपंच शंकरराव गोरे , उपसरपंच दिपक सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष राहुल साठे, सचिन जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, नागेश खोचरे , महेश पवारसह दुकानदार ग्रामस्थ उपस्थितीत होते.ग्रामसेवक चैतन्य गोरे यांनी प्रास्तविक   केले व शेवटी उपस्थितीतांचे आभार मानले.

 
Top