उस्मानाबाद / प्रतिनिधी

 जिल्हा व सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अरुण कालिदास महामुनी (वय ६३ वर्ष) यांचे उपचारा दरम्यान सोलापूर येथील रुग्णालयात दि. ३० एप्रिल रोजी निधन झाले. न्यायालयीन कामकाजात व्यक्तिवाद व उलट तपासणी करताना त्यांना ऐकण्यासाठी वकील बांधवांची विशेष गर्दी जमत असे विधि महामुनी हे उस्मानाबाद जनता बँकेचेलवाद अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच विविध सरकारी, खासगी व सहकारी संस्था व प्रतिष्ठानचे ते कायदेशीर सल्लागार देखील होते. ते हिंदुस्तान पेट्रोलियमचे सहाय्यक कायदा प्रबंधक विधिज्ञ चंदन महामुनी व सेंट्रल बँक उस्मानाबादचे कॅशियर नरेंद्र महामुनी यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top