उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

वाढत्या कोरोनाच्या रूग्णांमुळे ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांनी लस देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. परंतू लसीकरण केंद्रावर कोणताही समन्वय नसल्यामुळे लस उपलब्ध नसल्यामुळे कधी लसीकरण केंद्र बंद असते तर कधी लसी आल्यावर किती लोकांसाठी आली यांची माहिती न दिल्यामुळे हाजारो लोकांच्या रांगा लसीकरण केंद्रावर लागत आहेत. 

लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने प्रसिध्दी माध्यमाच्या द्वारे कोणत्या केंद्रावर लसीकरण कोणत्या तारीख होणार आहे, याची माहिती दिली. त्या माहितीनुसार कांही ठिकाणी लोकांनी पहाटे ५  वाजल्यापासून कांही केंद्रावर लोकांनी रांगा लावल्या विशेष म्हणजे सकाळी ९ वाजल्यापासून लसीकरणाची वेळ असताना ही लोक मात्र पहाटेपासून लसीकरण केंद्रावर जमा झाले होते. आरोग्य विभागाने वाढती गर्दी पाहता पहाटे ६ वाजता ३०० लोकांना लसीचे टोकन दिले. त्यानंतर ३०० लोकांसाठीच आज लस उपलब्ध झाली होती, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलामधुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ३०० लोकांसाठी लस होती  तर हे  पुर्वीच का जाहीर केले नाही?  उस्मानाबाद जिल्हयात २५ हजार लोकांना दुसरा लसीचा डोस देणे बाकी आहे. विशेष म्हणजे कॉव्हक्सीन ही लस गेल्या १५ दिवसापासून जिल्हयात नसल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या जिल्हयात कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड  दोन्ही लसीचा पुरवठा झाला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लोकांचे ऑनलाईन बुकिंग रद्द 

ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण केंद्रावरील वाढती गर्दी पाहता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची ऑनलाईन बुकिंग रद्द करण्यात आली आहे. जिल्हयात एकुण ८ हजार लोकांची ऑनलाईन बुकिंग रद्द केली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.हाणमंत वडगांवे यांना विचारले असता. त्यांनी सरकारच्या गाईड लाईन प्रमाणे १८ ते ४४ गटातील लोकांचे ऑनलाईन बुकिंग रद्द केल्याचे सांगितले. ज्येष्ठ लोकांना लसीकरणाचे काम करण्यास प्राधान्य दिल्यानंतर ४ ते ५ दिवसानी १८ ते ४४ लोकांसाठी ऑनलाईन लसीकरण बुकिंग चालु होईल, असे डाॅ.वडगावे यांनी सांगितले. 


 
Top