तुळजापूर/ प्रतिनिधी- 

आँनलाईन लसीकरणाच्या नोंदणीची वेळ अनिश्चित असल्याने  आँनलाईन नोंदणी करताना गैरसोय होत असल्याने .आ़ँनलाई नोंदणीसाठी योग्य वेळ निश्चित करण्याची मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

सध्या  १८  ते ४४ या वयोगटाचे लसीकरण आँनलाईन पध्दतीने नोंदणी सुरू आहे, आँनलाईन नोंदणी करीताची लिंक ही आपल्या कार्यालयाकडून सुरू करण्यात येते.आपणास विनंती करण्यात येते की आँनलाईन नोंदणीची एकच वेळ व तारीख निश्चित करून सर्व लसीकरण केंद्रावर प्रसिध्द करण्यात यावी. या मुळे नागरीकांना लसीकरण नोंदणी करणेकरीता सोयीचे होईल. तरी मे साहेबांनी वरील मागणीचा विचार करून कार्यवाही करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गवळी यांनी केली आहे. 

 
Top