एप्रिलच्या महिन्यात सर्वाधिक १५७३ पॉझिटिव्ह, १११ जणांचा मृत्यू


उमरग / प्रतिनिधी- 

तालुक्यात मागील तीन महिन्यापासून बाधित रुग्ण संख्या वाढत चालली आहे. गेले तीन महिन्यात २०५३ पॉझिटिव्ह तर १२३ जणांचा मृत्यू झाला. एप्रिलच्या महिन्यात सर्वाधिक १५७३ पॉझिटिव्ह, १११ जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याची सुरुवातहि त्याच गतीने झाल्याने शनिवारी (०१) सकाळी ॲंटीजेन चाचणीमध्ये ३४ तर स्वॅब अहवालात १२ पॉझिटिव्ह आल्याने एका दिवसात ४६ जण  पॉझिटिव्ह आले असून उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात गेल्या नऊ महिन्यात ४४०७ कोरोना पॉझिटिव्ह झाले असून ३७१७ कोरोनामुक्त झाल्यामुळे ४९८ जणांवर उपचार सुरू असून १९२ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल च्या महिन्यात गेल्या दोन महिन्यापेक्षा सर्वाधिक वेगाने रुग्ण संख्या वाढत असल्याने सरासरी ५२ प्रमाणे १५७३ बाधित आले असून ९९३ जण कोरोनामुक्त झाल्याने बरे होण्याचा दर ५०.८० टक्के तर १११ जण मृत्यू झाल्याने मृत्यूचा दर ७.०५ टक्के झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४६ पॉझिटिव्ह तर सात जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठा कहर झाला असल्याने अनेकांनी शेतशिवारात वस्ती थाटली. उपजिल्हा रुग्णालय, तालुका ग्रामीण आरोग्य विभागामार्फत शनिवारी घेण्यात आलेल्या १४४ ॲंटीजेन चाचणीत ३६ तर २६ जणांचे स्वॅब अहवालात १२ जण पॉझिटिव्ह आल्याने ४६ जण बाधित आले आहेत. तालुक्यात नऊ महिन्यात ४४०७ पॉझिटिव्ह झाले तर ३७१७ कोरोना मुक्त झाल्याने सद्या ४९८ रुग्णांवर शासकीय रुग्णालय, खाजगी कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. उर्वरीत रुग्ण गृहविलगिकरण व जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ५९ जण पॉझिटिव्ह व दोघांचा मृत्यू. मार्च महिन्यात ४२१ पॉझिटिव्ह व दहा जणांचा मृत्यू तर एप्रिल महिन्यात १५७३ जण पॉझिटिव्ह व १११ जणांचा मृत्यू झाल्याने गेल्या तीन महिन्यात २३ च्या सरासरीने २०५३ पॉझिटिव्ह तर सहा च्या सरासरीने १२३ मृत्यू झाले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी ४६ जण पॉझिटिव्ह तर सात जणांचा मृत्यू झाला, त्यात गौतम नगर, कसगी, गुंजोटी, कोथळी, मुरूम, खरोसा अन उस्मानाबाद या गावात प्रत्येकी एक असे सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या नऊ महिन्यात ४४०७ पॉझिटिव्ह झालेत तर ३७१७ कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत १९२ जणांचे मृत्यू झाले. सद्या ४९८ जण उपचारात आहेत. शहरात शिवपुरी रोड चार, भिमनगर दोन, कुंभार पट्टी, मलंग प्लॉट, मेन रोड, ओंकार नगर, झोपडपट्टी, जुना दवाखाना जवळ, बालाजी नगर, राम मंदिर, पतंगे रोड, शिवपुरी कॉलनी,आरोग्य नगर, जकापुर कॉलनी येथे प्रत्येकी एक असे १८. ग्रामीण भागात एकोंडीवाडी तीन, येळी तीन, कोथळी दोन, येणेगूर दोन, बोरी, मुरूम, कवठा, मुळज, डिग्गी, भुयार चिंचोली, तुरोरी, जकेकुरवाडी, व्हंताळ, दगडधानोरा, भिकार सांगवी,तुगाव, एकोंडी, गुगळगाव, काळ निंबाळा, भुसणी, माकणी, देवी हळ्ळी येथे प्रत्येकी एक २८ असे एकूण ४६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात १८६३ व ग्रामीण भागात सर्वाधिक २५४४ पॉझिटिव्ह आलेत. ३७१७ कोरोना मुक्त झाले असून १९२ जणांचा मृत्यू झाल्याने सद्यस्थितीत ४९८ रुग्ण उपचारात आहेत.कोविड उपजिल्हा रुग्णालय,तालुका आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या १६६१९ ॲंटीजेन चाचणीत २४०८ पॉझिटिव्ह आलेत. दरम्यान शनिवारी ४३ जणांचे स्वॅब अहवाल तपासणीस पाठविण्यात आले असून रविवारी (दि ०२) रात्री पर्यंत अहवाल प्राप्त होणार आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात २४ गावात सर्वाधिक कोरोना संसर्ग फोफावल्याने गावांच्या सीमा सिल करण्यात आल्या आहेत. गावातील अनेक कुटुंब कोरोनाच्या भीतीने शेतातच संसार थाटले आहेत.

 
Top