उस्मानाबाद / प्रतिनिधी-

िद्यार्थीनिनी स्वताच्या आरोग्याची काळजी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावी आणि विद्यार्थीनिनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बाबत त्यांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद च्या संचालिका सौ मंजुळा आदित्य पाटील यांनी  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद च्या जेष्ठ संचालिका सौ प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फ्लाइंग किड्स इंटरन्याशनल इंग्लिश स्कूल  मुलींचे आरोग्य शिबीर कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले .

 कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या कि मुलींच्या आरोग्याची काळजी या बाबत शालेय विद्यार्थिनी आणि त्याचे पालक विशेषतः मुलींची आई यांना मुलींचे वैयक्तिक आरोग्य कसे चांगले ठेवावे या बाबत प्रबोधनाची गरज आहे आणि असे प्रबोधन केल्यास मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य   चांगले राहील थोडक्यात मुली निरोगी आणि सदृढ राहतील .

 सदर शिबिरात डॉक्टर वैशाली डंबळ  यांनी उपस्थित मुलींच्या आरोग्याची तपासणी केली आणि मुलीना वैयक्तिक मार्गदर्शन केले .  सादर कार्यक्रमाचे प्रास्ताविक फ्लाइंग ची इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी कुमारी आर्या शरद सदाफुले हिने केले तर शेवटी सर्वांचे आभार  फ्लाइंग चे प्राचार्य श्री चंद्रमणी चतुर्वेदी यांनी मानले सदर कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .


 
Top