उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यात कोरोना रुग्णांना शासकीय पातळीवर विविध ठिकाणी सेवा दिल्या जात आहेत. रुग्णांच्या व्यवस्थेची व ऑक्सीजन उपलब्धते बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील,आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे उपस्थित होते.

तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड सेंटर येथे भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबत विचारपुस केली.जिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लॅटची पाहणी करण्यात आली. या ऑक्सीजन प्लॅट रुग्णांना ऑक्सीजन देण्यास मदत होणार आहे.

 
Top