तेर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पुरातन त्रिविक्रम मंदिराच्या दक्षिण दिशेस  असलेले पुरातन तिर्थकुंडाच्या उत्खननाची आवश्यकता आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन त्रिविक्रम मंदिर असून या मंदिराच्या जवळच दक्षिण दिशेस विटांनी बांधलेले पुरातन तिर्थकुंड आहे.याचा स्पष्ट उल्लेख “सत्यपुरी “ग्रंथात आहे.तिर्थकुंडातील पाण्याने केलेले स्नान पवित्र मानले जाते.पुरातन तिर्थकुंड  विटांनी बांधलेले असून तिर्थकुंड दगडी शिळेने झाकून टाकलेले आहे.प्रशासनाने पुरातन ठेवा असलेले तिर्थकुंडांचे उत्खनन करून पुरातन पवित्र तीर्थकुंडास गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे.

 
Top