उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना महामारीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जगभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे   राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंची जयंती घरातच राहून साजरी करावी. त्यादिवशी सलग अठरा तास अभ्यास करून या महामानवांना अभिवादन करावे, असे आवाहन प्रबुद्ध इंजिनिअर्स ग्रुप आणि क्रांतिवीर दत्तोबा भोसले प्रतिभा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

मानवासमोर कोरोनाचे संकट उभे असताना  महामानवांच्या विचारांचे आचरण करून लढण्याची ताकद निर्माण करणे हेच खरे अभिवादन आहे. ‘स्टे-होम अ‍ॅन्ड स्टडी स्टे-सेफ’ हा हॅशटॅग वापरून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरीच राहा, शारीरिक अंतर राखा आणि सुरक्षित राहा. या सूचनेचे तंतोतंत पालन करत या महामानवांची जयंती साजरी करावयाची आहे.

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याच पद्धतीने म्हणजे सलग अठरा तास अभ्यास करून अभिवादन करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. म्हणून यावेळी खरी आचार विचारांची जयंती आपण आपल्या घरीच राहून अभ्यास साजरी करायची आहे. या अभ्यास अभिवादन कार्यक्रमात जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रबुद्ध इंजिनिअर ग्रुप व क्रांतीवीर दत्तोबा भोसले प्रतिभा प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे.

 
Top