उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांनी त्याबाबत स्वतः फेसबुकवर पोस्ट केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट असताना देखील पालकमंत्री 26 जानेवारी नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात न आल्याने त्यांच्यावर टीका होत होती तर भाजपने पालकमंत्री गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर यावे असे पत्रक काढून निमंत्रण दिले होते मात्र गडाख आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहे

गडाख यांनी पोस्ट केले आहे की, माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव आल्यामुळे मी गृहविलगिकरणांत आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व तपासणी करून घ्यावी.सर्वाना माझी विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे व  आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी. मास्क वापरा , नियमित हात धुवा व घराबाहेर पडू नका . 

शंकरराव गडाख, मंत्री, मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री , उस्मानाबाद

 
Top