वाशी/ प्रतिनिधी- 

 वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील पत्रकारांना आमच्या विरोधात बातमी का करतो म्हणुन सटवाईवाडी येथील ग्रा.पं सदस्य किसन खोत ह्यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन धमकावले तसेच पत्रकारांना खोट्या खंडनीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली त्याबाबत  वाशी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना,मुंबई शाखा वाशी जि.उस्मानाबाद  यांच्या  वतीने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत तहसीलदार श्री.नरसिंग जाधव यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे कि मौजे सटवाईवाडी ता.वाशी येथे जवळपास ५ दिवसापासून लाईट नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता व इतर असुविधा बाबत गावातील काही नागरिकांनी पत्रकाराशी संपर्क करून माहिती घेणे बाबत विनंती केली होती . त्या संदर्भाने पत्रकार वैभव पारवे ,विश्वनाथ जगदाळे व सुधीर घोलप हे सटवाईवाडी येथे दिनांक ०३/०४/२०२१ रोजी जाऊन सरपंचाला भेटले व गावातील समस्या बाबत माहिती घेतली असता सरपंचा ने सविस्तर माहिती दिली मात्र त्यानंतर त्या गावातील ग्रा.पं सदस्य किसन खोत यांनी त्याच दिवशी दुपारी पत्रकार वैभव पारवे यांना फोन करून तू आमच्या गावात माझ्या परवानगी विना कशामुळे आला असे बोलून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून आमच्या गावातील बातम्या छापू नयेत यासाठी दाब दडप केले आहे . तसेच आमच्या गावातील बातम्या छापल्यास तुमच्यावर खंडनीचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली . त्यामुळे संबंधितावर पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत तात्काळ कारवाई करावी अन्यथा  तहसील कार्यालय समोर सर्व पत्रकारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल . अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले .

यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री. शहाजी चेडे, उपाध्यक्ष श्री. विलास गपाट, सचिव श्री. दादासाहेब लगाडे तसेच नवनाथ टकले,नेताजी नलवडे, अजय वीर, मधुकर राऊत, शोएब काझी, शिवाजी गवारे, वैभव कुलकर्णी, वैभव पारवे, सुधीर घोलप, विश्वनाथ जगदाळे पत्रकार उपस्थित होते.

 
Top