कळंब / प्रतिनिधी- 

कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार,महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हात,तालुक्यात रक्तदान शिबीराच्या माध्यमातून रक्त संकलित करून राज्यातील गरजूवंताला उपलब्ध करून द्यावे म्हणून दि.१६ एप्रिल रोजी नगर परिषद वाचनालय येथे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुक्यातील रक्तदात्यांचे रक्तदान शिबिर संपन्न झाले.  

 या शिबिराच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.डॉ. संजय नवले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ह्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ५४ रक्तदात्याचे ब्लड संकलित करून शासकीय ब्लड बँकेत जमा करण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,जिल्हासचिव राजाभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,प्रा.शिवाजी लकडे,प्रदेश सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे,पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत पवार,नगराध्यक्षा सौ.सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष अमर गायकवाड,संजय मुंदडा,सागर मुंडे,सुभाष घोडके,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के,शहराध्यक्ष मुत्सदिक काझी,उपशहराध्यक्ष बाळासाहेब कथले,युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार,कार्याध्यक्ष उमेश मडके,औदुंबर धोंगडे,सुहास बारकुल,उपाध्यक्ष विठ्ठल कोकाटे,सचिव समाधान बाराते,शहर अध्यक्ष रणजित खोसे,उपाध्यक्ष अजय जाधव,सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष राहुल कसबे,नगर परिषद गटनेते लक्ष्मण कापसे,महिला अध्यक्ष रुकसाना बागवान,अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष सलमा सौदागर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे,कार्याध्यक्ष अतुल धुमाळ,प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,स्वप्नील चिलवंत,सौरभ मुंडे,महेश पुरी,ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब आडसूळ,संघटक संतोष पवार,ऋषिकेश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top