उस्मानाबाद/ प्रतिनिधी : - 

 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० ते २०२०-२१ या वर्षाचा सर्व विकास निधी कोरोना महामारीच्या उपाय योजनासाठी वर्ग करावा, अशी मागणी शिवसेनेचे उस्मानाबाद शहर उपप्रमुख प्रशांत साळुंके यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने माणूस जिवंत राहिला पाहिजे या हेतूने सध्या कोरोना या महामारीच्या काळामध्ये जिल्ह्यात तातडीने औषधोपचार तसेच ऑक्सिजन बेडची कमतरता लक्षात घेऊन भविष्यातील आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आपण जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने आपल्या अधिकाराचा वापर करून सध्याच्या परिस्थितीत माणूस जगला पाहिजे या हेतूने आरोग्याला निधी कमी पडत असून जिल्हा नियोजन समितीचा २०१९-२० व २०२०-२१ चा संपूर्ण निधी तात्काळ आरोग्यासाठी  ऑक्सिजन प्लॅन्ट तसेच व्हेंटिलेटर मशीन व अत्याधुनिक सर्व सोयी सुविधायुक्त ॲम्बुलन्स तात्काळ खरेदी करण्यासाठी वर्ग करण्यात यावा.विद्युतशव वाहीनीची मागणी जुनीच असुन ती सुध्दा ताक्ताळ याच निधीतून आरोग्य विभागाचेमार्फत उभारण्यात यावे  त्याबरोबरच सामान्य जनतेच्या आरोग्याची हेळसांड थांबवावी अशी मागणीही साळुंके यांनी केली आहे.


 
Top