तुळजापूर / प्रतिनिधी-

कोविड 19 या साथीच्या महामारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याने त्या अनुषंगाने सोमवार दि.५ रोजी राञी ८ वाजल्या पासुन पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना मंदीरात प्रवेश बंद करण्यात आल्याची माहीती मंदीर समितीने दिली .

या कालावधीत श्रीदेवीजींच्या व उपदेवतांच्या दैनंदिन नित्योपचार पुजा या पुर्वपार प्रथेप्रमाणे मंहत पुजारी मानकरी यांचे हस्ते होणार आहेत.

भाविकांनी महाराष्ट्र सरकार व  जिल्हाअधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मंदीर प्रशासनास  सहकार्य करावे, भाविकांनी  आँनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदीर समितीने करण्यात आले आहे. 

 
Top