परंडा / प्रतिनिधी : -

वस्ती शाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेतल्यानंतर काही शिक्षकांचे डीएड पूर्ण झालेले नव्हते.कालांतराने डीएड पूर्ण झाले नंतर प्रशिक्षित शिक्षकांची वेतन श्रेणी मिळावी यासाठी संबंधित वस्ती शाळा शिक्षकांनी दोन वर्षांपूर्वी आपले प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केले होते.

यातील काही वस्तीशाळा शिक्षकांनी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेकडे लेखी अर्जाद्वारे आमचा प्रश्न उचलून धरावा नि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मागणी केली होती.

प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने सदरिल विषय लेटरहेड वर घेऊन सहा महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा जि.प.अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत, तत्कालीन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचे समोर मांडला होता .दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी‌ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांचे दालनात झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा विषय त्यांचे निदर्शनास आणून दिला यावर त्यांनी शिक्षणाधिकारी प्रा.अरविंद मोहरे यांना तातडीने कार्यवाही करत संचिका माझ्याकडे पाठवा अशा सूचना दिल्या.

याचाच परिपाक म्हणून सीईओ डॉ.विजयकुमार फड यांनी शुक्रवारी दि.१६ एप्रिल रोजी संचिकेवर स्वाक्षरी करत बहुप्रतिक्षेत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांना न्याय दिला. जवळपास दोन वर्षांपासून हा विषय मंजूरी च्या प्रतिक्षेत होता, प्रहार शिक्षक संघटनेकडे हा विषय येताच सीईओ डॉ.विजयकुमार फड यांचे समोर‌ मांडला. संचिका त्यांचेकडे येताच प्रशिक्षित शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर केली.यामुळे सदरिल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

जि.प.अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी प्रा.अरविंद मोहरे, अधीक्षक सुरेश वाघमारे, वरिष्ठ सहाय्यक शिरपूरकर या सर्वांचे प्रहार संघटनेच्या वतीने आभार व स-हदय कृतज्ञता.

याकामी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा समन्वयक फिरोज शेख, उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले,जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गोरे, उस्मानाबाद तालुका संपर्क प्रमुख धम्मदीप सवई, महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, उपाध्यक्ष शहाजी झगडे,सचिव परशुराम लोहार, तालुका नेते लक्ष्मण औताडे यांनी यशस्वी लढा दिला.

या शिक्षकांना मिळाला न्याय

(१)सुधर्म भाग्यवंत शाळा गोसावीवाडी(आंबी)- परंडा.

(२) चंद्रकला वाघमोडे शिराळा-परंडा.

(३) रावसाहेब पवार कुन्सावळी-तुळजापूर

(४ ) दादासाहेब चव्हाण तिंत्रज-भूम.

(५)धनंजय ठोंबरे चिवरी-

(६)युवराज कांबळे-वाशी

(७)वासंती गायकवाड-तुळजापूर.


 
Top